माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना 'हिंदू दहशतवाद' असा उल्लेख केल्याने सनातन धर्मीयांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ, शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतिष तात्या महाले यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने धुळे शहरातील झाशी राणी चौक परिसरात चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारत आक्रमक निषेध आंदोलन केले.