परभणीचे नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी आज गुरुवार 21 ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. मावळते परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संजय चव्हाण यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत केले आणि जिल्हाधिकारी पदाचा पदभार सुपूर्त केला.