आज दि.३ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० वाजता अंजनगाव सुर्जी पंचायत समिती येथील शिक्षण गटसाधना समूह केंद्राच्या सभागृहात गट शिक्षणअधिकारी सुधीर खोडे व दोन शिक्षकांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षकांनी व शिक्षक पतसंस्थेच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश गोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर शिक्षक पंत संस्थेचे अध्यक्ष दीपक मोरे यांचा सत्कार नईम सर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला