गणपती विसर्जनाला धामणगांव रेल्वे तालुक्यातील वाघोली या गावातील 22 वर्षीय मुलगा हा पाण्यात वाहून गेला व काही वेळानी शोध घेतला असता मृत अवस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे .गणपती विसर्जनाला सुरुवात झाली असून शासन हे सर्वांना आवर्जून सांगतात की, काळजीपूर्वक विसर्जन करावे मात्र काही तरुण आपल्या जीवाची परवा न करता विसर्जनाला गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा पाण्याचा अंदाज न येता वाहून जातात. त्यातच वाघोली या गावातील 22 वर्षीय करण चव्हाण हा तरुण विसर्जनाला गेला असता वाहून गेला.