तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार येथे दि. 11 सप्टेंबर रोज गुरुवारला दु. 4 वा. महसूल पथकाचे मंडळ अधिकारी श्वेता नंदुरकर हे आपल्या पथकासह रेती वाहतूक प्रतिबंधात्मक कारवाईसाठी वारपिंडकेपार नदीपत्रात गेले असता त्यांना दोन विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर मधून विनापरवाना रेतीची वाहतूक करताना निदर्शनास आले. यावेळी महसूल पथकांना पाहताच ट्रॅक्टर चालकांनी रस्त्यावर रेती खाली करून ट्रॅक्टरचा पळ काढला. याप्रकरणी पसार झालेल्या दोन्ही ट्रॅक्टर चालक मालका विरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.