ऐतिहासिक रोहा शहरात नव्याने उभारण्यात आलेले डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृह तरुण पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. रोहा येथील डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृहाचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे आदी उपस्थित होते.