चांदूरबाजार तालुक्यातील माधान येथे काही दिवसा अगोदर ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन, शेतकरी तथा नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा दोन सप्टेंबरला परिसरात पावसाचे थैमान सुरू असल्याने नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने दिनांक 2 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता नुकसान ग्रस्त गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देऊन प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला आहे