रामटेक मनसर मार्गावर असलेल्या चक्रधर स्वामी मंदिर मनसर समोर मनसर कडून मनसर माईन कडे रेती भरून धावत असलेल्या एका ट्रकने एका पादचारी युवकाला धडक दिल्याने युवक जबर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. 8 ऑगस्टला सायं. साडेचार वाजताच्या दरम्यान घडली. गंभीर जखमी युवकाचे नाव केशव सिताराम कोडापे वय 32 वर्षे रा. योगीराज हॉस्पिटल जवळ रामटेक झोपडपट्टी आहे. तो मूळचा मुजरा राय पो. चिनोरा जिल्हा चंद्रपूर येथील आहे. जगब जबर जखमी केशव यास मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे भरती करण्यात आले आहे.