कुरुंदवाड नगरपालिकेचा कारभार दिवसेंदिवस अजब आणि हलगर्जीपणाकडे वळलेला दिसतो आहे.बौद्ध समाज मंदिराजवळील मुख्य रस्त्यावर असलेली बंद अवस्थेतील ट्यूबलाईट कोसळण्याच्या स्थितीत असून,नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर ट्यूबलाईट एकाच जागी अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत लटकत असून, ती केव्हाही खाली पडू शकते.या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व शहर कृती समितीचे सदस्य सुनील कुरुंदवाड यांनी सांगितले.