लातूर, दि. 07 सप्टेंबर 2025 :आज सकाळी ठीक 10.30 वा. मांजरा प्रकल्प 98.94% क्षमतेने भरला आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज 07 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वा. दोन वक्रद्वारे 0.25 मीटर उंचीने उघडण्यात आले असून मांजरा नदीपात्रात 1747.14 क्यूसेक्स (49.48 क्यूमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.