आज गुरुवार 4 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, मध्यरात्रीला पडेगाव परिसरातील तारांगण कासलीवाल परिसरातील सोनाराची दुकान चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर मिटमिटा परिसरातील किराणा दुकान सुद्धा चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला आहे, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, सदरील चोरट्यांचा सीसीटीव्ही समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, सदर घटनेची नोंद छावणी पोलिसांनी घेतली आहे.