मंठा तालुक्यात ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा.: शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप बोराडे शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी मंठा तालुक्यातील सर्व मंडळात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. या आतीवृष्टीमुळे तालुक्यातील खरिपाची संपूर्ण पिके वाया गेली असल्याने शेतकऱ्याची कंबरडे मोडले आहे. परिणामी बळीराजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने मंठा तालुका ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी मागणी शिवसेना पक्षाचे तालुकाप्