सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी दुपारी 1 वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील रस्त्यावरील पुलाची पाहणी केली. पूरस्थितीमुळे या पुलावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पाहणीदरम्यान खासदार शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकरे यांना स्पष्ट सूचना दिल्या की, पुलाच्या चुकीच्या बांधकामामुळे पाणी पुलाखालून न जाता शेतातून रस्त्यावरून जात आहे. त्यामुळे नवीन शिडी वर्क करून भरावा टाकून रस्ता पुलाच्या लेव्हलने दुरुस्त करावा.