लातूर -लातूर शहर महानगरपालिकेकडून प्लास्टिक विरोधी मोहीम जोरदारपणे सुरू असून, मंगळवारी (दि. २६) या मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. शहरातील एका गोदामावर टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल २ टनांहून अधिक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला. जप्तीची किंमत अंदाजे साडेचार ते पाच लाख रुपयांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत प्लास्टिकची मोजदाद सुरू असल्याने जप्तीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे मनपाच्या वतीने सांगितले.