आगामी सार्वजनिक सण उत्सव अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत औंढा नागनाथ पोलीस ठाणे येथे दिनांक २३ ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक जीएस राहिरे,नगराध्यक्ष एसपी कनकुटे, उपनगराध्यक्ष अनिल देव, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत,पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, महावितरणचे किरण मोरे,माजी उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख,किरण घोंगडे,राहुल दंतवार,बबन सोनुणे,अजहर इनामदार उपस्थित होते