मोहोळ तालुक्यातील गलंदवाडी गावच्या हद्दीत थिटे वस्तीवर सहा दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल असा एकूण दोन लाख 61 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना मंगळवारी (दि. 9) मध्यरात्री घडली. तानाजी थिटे व पत्नी सिंधू थिटे हे वृद्ध दाम्पत्य थिटे वस्तीवर वास्तव्यास आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी घरात घुसून त्यांना चाकू व कोयत्याने मारहाण केली.