आज ५ ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी ७.३० वाजता अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी बेलपुरा रोड, कंवर नगर, अंबिका नगर व राजापेठ या परिसरात स्वच्छता व अतिक्रमण संदर्भातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.पाहणी दरम्यान आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना स्वच्छता बाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश दिले. तसेच, अनधिकृत अतिक्रमण झोनमध्ये येणाऱ्या ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.नागरिकांना स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत, सार्वजनिक ठिकाणी...