परभणी तालुक्यातील सनपुरी परिसरात सोमवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे संपूर्ण नांदापूर रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे या रोडची वाहतूक बंद झाली आहे. तसेच शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाण्यामुळे अक्षरशा जमिनी खरडून गेल्या आहेत तर विहिरीही तुडुंब भरले आहेत. शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे होत्याचे नव्हते झाले आहे. तरी शेती पिकांची पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे.