मोहाडी तालुक्यातील आंबेडकर वार्ड वरठी येथे दि.20 आगस्ट रोज बुधवारला दुपारी 3 वाजता वरठी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मन्नू यादव यांच्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड घालून आरोपीच्या ताब्यातील 300 kg मोहफास सडवा तसेच दारू गाळप करण्याचे साहित्य असा एकूण 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये आरोपी विरुद्ध वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.