दारव्हा तालुक्यातील पेकर्डा गावात गेल्या पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील हरभरा आणि गव्हाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विजेअभावी सिंचन होत नसल्याने शेतातील पिके करपून जात आहे. त्यामुळे पेकर्डा येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला दी. ९ डिसेंबर दु. ३ वा.निवेदन दिले असल्याची माहिती शेतकरी शालिक चव्हाण यांनी ९ डिसें. ला दु. ४ वा. प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.