फुगेवडी येथील स्मशानभूमी जवळच्या चेंबरमध्ये शेळी अडकल्याची माहिती पिंपरी चिंचवड मुख्य अग्निशमन केंद्राला मिळाली, त्यानंतर मुख्य अग्निशमन केंद्रातून एक पथकासह वाहन तत्काळ घटनास्थळी रवाना झाले.घटनास्थळी गेल्यावर जवानांनी पाहणी केली असता चेंबरमध्ये एक शेळी अडकली होती. जवानांनी अत्यंत दक्षतेने शेळीची सुटका केली.