लातूर- शहरात काल सायंकाळपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर आज दुपारी १ वाजता लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी तथा उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली.