अकोल्यात जिवंत विद्युत खांबाचा शॉक लागून अपघात - एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी अकोला शहरात आज शुक्रवारी मुसळधार पावसात जुन्या शहरातील महापालिका हद्दीतील एक हृदयद्रावक अपघात उघडकीस आला. सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, कामावरून परतणाऱ्या दोन तरुणांना अचानक जिवंत विद्युत पुरवठा होत असलेल्या खांबावरून येणाऱ्या विद्युत प्रवाहातून एक भीषण दुर्घटना घडली.. दरम्यान या भीषण अपघातात सय्यद राजा नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण अस्लम गंभीर जखमी झाला आहे.