भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून पवनी येथील विविध राजकीय पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. हा पक्षप्रवेश ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या भंडारा येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आला. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाचा दुपट्टा घालून पक्षप्रवेश करून घेतला.