औसा -निलंगा तालुक्यातील सरवडी गावच्या तिन्ही तरुणांच्या कुटुंबावर काळाने अक्षरशः घाव घातला आहे. रविवारी रात्री लामजना–लातूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जगण्याचा प्रवास अकाली थांबला. गावाकडे परतणाऱ्या या तिघांना करजगाव पाटी येथे समोरून आलेल्या कारने जोरदार धडक दिली.धडकेत सोमनाथ दयानंद हिप्परगे (वय 22) व अभिजित शाहूराज इंगळे (वय 23) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दिंगबर दत्ता इंगळे (वय 27) यांनीही उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला.