तीन सप्टेंबर रोजी एकाच दिवशी डोंबिवली आणि मानपाडा परिसरामध्ये चैनच्या घटना घडल्या होत्या. त्याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तीन आरोपींना अटक केली. अधिक तपास केला असता यांच्या विरोधात ठाणे,पुणे आणि उत्तर प्रदेश मधील विविध ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये यांच्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत असून त्यांच्याकडे गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे देखील आढळून आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.