विविध सरकारी योजनांच्या मायाजाळ्यात शेतकऱ्यांना अडकवून फसवले जात असून, शेतकऱ्यांपेक्षा सेतू केंद्रे व सरकारी अधिकाऱ्यांचेच भले होत आहे, असा आरोप किसान ब्रिगेडचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी केला. दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास स्थानिक किसान ब्रिगेडच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ई-पिक पाहणी ही दोषपूर्ण असून शेतकऱ्यांना वारंवार शेतात जावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे.