रावेर तालुक्यात कुसुंबा हे गाव आहे. या गावाकडून उटखेडा जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहन क्रमांक एम. एच. ०४ डी. एस. ६६८३ याद्वारे इरफान तडवी व धन्नालाल भिल हे दोन जण वाळू चोरी करून येत होते. हा प्रकार रावेर पोलिसांच्या निदर्शनास येतात त्यांनी सदर वाहन पकडले व वाहन वाळू असा ३ लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.