औसा -औसा तालुक्यातील औसा–लामजना महामार्गावर सध्या अपघाताचा धोका वाढत चालला आहे. विजय सोया कंपनीसमोर मोठ्या प्रमाणात ट्रक उभे राहिल्याने या मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांचा संताप उसळला आहे. नुकताच वाघोली गावाजवळ या महामार्गावर एका भाऊ–बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेचे दुःख अजूनही ताजे असतानाच पुन्हा या मार्गावर अपघाताची भीती निर्माण झाल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने या ठिकाणी उभे असलेले ट्रक हटविण्याची मागणी केली आहे.