चोपडा तालुक्यात नागलवाडी हे गाव आहे. या गावात गणेश गंभीर बारी यांचे छत्रपती ऍग्रो मॉल आहे. या मॉलच्या काउंटर मधून अज्ञात चोरट्याने ७२ हजाराची रोख रक्कम चोरी केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.