बीड शहरातील सावता माळीनगर परिसरात घरफोडीची मोठी घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व मोठ्या प्रमाणात ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घरफोडीच्या ठिकाणी डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट पथक दाखल झाले असून ठसे व अन्य पुरावे गोळा करण्यात येत आहेत. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले