इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) धुळे शहरात सिरत कमिटीच्या वतीने भव्य आणि शांततापूर्ण मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही मिरवणूक डीजेच्या आवाजाशिवाय काढण्यात आली, जे या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. पैगंबरांचे हे दीड हजारावे जयंती वर्ष असल्याने मुस्लिम बांधवांमध्ये यंदा विशेष उत्साह दिसून आला.