माजी केंद्रीय मंत्री व खासदार संजय धोत्रे यांच्या अकोला येथील निवासस्थानी दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्साहात बाप्पाची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा लोकोत्सव असून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी गणरायाचे आशीर्वाद लाभतील.” स्थापनेला सौ. मंजुषाताई सावरकर, प्रल्हादराव सावरकर, हर्षल सावरकर, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जनार्दन