केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा फोटो असलेल्या बॅनरची एका व्यक्तीने विटंबना केली. संबंधित व्यक्तीने बॅनर खाली पाडून त्यावर झोप घेतल्याचे समोर आले असून यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्व. मुंडे साहेब हे राज्याचे लोकप्रिय नेते असल्याने त्यांच्या बॅनरचा अपमान झाल्याची घटना गावात चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणी संबंधित घटनेचा अधिक तपास सुरू असून नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी