सध्या जिल्ह्याचा जीडीपी एक लाख पाच हजार कोटी इतका आहे. २०२७-२८ पर्यंत तो १ लाख ८६ हजार कोटी होणार आहे.परंतु लघु उद्योग भारती आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तो २०२७-२८ पर्यंत ३ लाख कोटींवर नेण्याचा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केला. ‘उद्योग सुसंवाद २०२५’ कार्यक्रमाचे आयोजन वासुदेव बळवंत फडके सभागृह, पनवेल येथे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पनवेल मनपा उपायुक्त विधाते आदी उपस्थित होत