Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 7, 2025
आज मंगळवार सात ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांशी बोलताना मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली की, दरवेळेस मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसीचे नेते त्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण करतात, आता मराठ्यांना जागा होण्याची वेळ आली असून आता ओबीसीच्या नेत्यांना मराठ्यांनी जशास तशी उत्तर द्यावे अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया आज रोजी जवाहर नगर येथे दिली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.