ठाण्यातील सिडको बस स्टॉप जवळ रेल्वे ट्रॅक वरून एक व्यक्ती जात असताना तिचा पाय घसरला आणि ती व्यक्ती स्लो रेल्वे ट्रॅक खाली लोखंडी गर्डर मध्ये अडकली होती. माहिती मिळताच ठाणे नगर पोलीस लोहमार्ग पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि व्यक्तीला बाहेर काढून डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.