पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद वर्धा यांनी आता वर्धा शहरातील आर्वी नाका सह सर्व सिग्नलवर स्टॉप लाईन आणि झेब्रा क्रॉसिंग लाईन आखण्यात आल्या आहेत. यामुळे वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.वर्धा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेने सर्व वाहन चालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी वाहतूक सिग्नलच्या नियमांचे पालन करावे. असे आज 23 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे