तुळापूर व वढू (बु.) येथे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र समाधीस्थळास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट दिली व दर्शन घेऊन विनम्र अभिवादन केले. दरम्यान स्मारकाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि सदरील कामासंबंधित आवश्यक त्या सूचना दिल्या.