सेनगांव तालुक्यातील सावरखेडा या ठिकाणी आज सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने वाजत,गाजत, फटाक्याची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करून मुंबईला गेलेल्या मराठा बांधवांचे गुलाल उधळून गावात स्वागत करण्यात आले. करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते तर त्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर मनोजने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.