आगामी नवदुर्गा उत्सव, विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन आदी सण-उत्सव शांततेत पार पाडावेत, यासाठी ‘वन विंडो’ प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. नियोजन भवनातील बैठकीत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अपर पोलिस अधीक्षक सी.के. रेड्डी आदी उपस्थित होते. यावर्षी १,३५६ नवदुर्गा मंडळांची नोंदणी झाली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त आणि दामिनी पथक सज्ज राहणार आहे. अष्टमी-नवमीला रात्री १२ वाजेपर्यंत ध्वन