पिंपरीत पर्यावरणपूरक सामूहिक गणेश विसर्जनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पिंपरी येथील आसवानी असोसिएट्स व ॲस्पिरिफाय एन्व्हायर्नमेंट यांच्यामार्फत संयुक्तपणे हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विसर्जनासाठी आलेल्या गणेश मूर्तींवर रासायनिक प्रक्रिया करुन त्यापासून वृक्षारोपणाच्या कुंंड्या बनविण्यात येणार आहे.