सातपूर भागातील महिंद्रा गेट, गायकवाड चौक, प्रबुद्ध नगर येथून सोळा वर्षे अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना दिनांक पाच सप्टेंबर रोजी उघडकीस आली असून दुपारी सव्वा बारा वाजता सातपूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा सप्टेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची सोळा वर्षे अल्पवयीन मुलगी ही प्रबुद्ध नगर, गायकवाड चौक येथे गेलेले असताना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून तिला पळून नेले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राकेश न्हाळदे पुढील तपास करत आहे.