कोस्टल मार्गाच्या पॅकेज बी अंतर्गत गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर बाधित होत असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल पाडू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची आज शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता भाजप नेत्या आमदार विद्या ठाकूर यांनी भेट घेऊन सविस्तर निवेदन देत मागणी केली.