ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयासमोर आज सकाळी ११:३० पासून आमरण अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाप्रमुख विपुल नाथे व प्रकाश टाक यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.ओबीसी समाजाचे हक्क अबाधित राहावे यासाठी ओबीसी नेते माजी मंत्री छगनराव भुजबळ यांच्या आदेशाने हे आंदोलन छेडण्यात आले असून यात विविध संघटना,युवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.