पंचवटी भागातील मोरे चाळ, म्हसोबा नगर येथे 19 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक घडली असून पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पना एकनाथ भवर राहणार मोरे चाळ, म्हसोबा नगर, पेठ रोड हिने राहत्या घरात लोखंडी पाईपला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. बेशुद्ध अवस्थेत तिला तिचा भाऊ शंकर भवर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले असत डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.