अकोला जीएमसी व सर्वोपचार रुग्णालयातील जननी सुरक्षा योजनेत तब्बल ११.५० लाखांचा अपहार उघडकीस आला आहे. प्रा. डॉ. अपर्णा वाहाणे यांनी नियम मोडून स्वतःच्या नावाने खाते उघडून पाच वेळा सेल्फ विड्रॉलद्वारे ही रक्कम काढल्याचा आरोप आहे. तक्रारदार गणेश कुरई यांच्या तक्रारीनंतर अमरावती येथील तीन सदस्यीय चौकशी समिती दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जीएमसी अकोला येथे दाखल झाली असून चौकशी सुरू आहे. समितीत डॉ. रमेश बनसोड, डॉ. संदीप हेडाऊ आणि अशोक कोठारी यांचा समावेश आहे. समितीने चारही संबंधित अध