बाळापूर शहरातील श्रीराम मंदिराजवळील पाण्याच्या टाकीतून लाखों लिटर पाणी बटवाडी रस्त्यावर वाहत असल्याची बाब शुक्रवार दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली असून लाखों लिटर पाणी बटवाडी रोडवरून वाहुन वाया जातं असल्यामुळे तेथील शाळकरी विद्यार्थ्यांसह पालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला कारण ही वेळ सकाळची शाळा सुटण्याची व दुपारची शाळा भरण्याची होती.मात्र पाऊस नसतांनाही लाखो लिटर पाणी शाळेजवळून वाहत असल्यामुळे शाळकरी मुलं आचार्य व्यक्त करतं होते.