शिवांगी नगर येथे राहणाऱ्या एका प्रॉपर्टी डीलरच्या खुनाप्रकरणी चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने अटक केली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून मृताच्या साळीच्या मुलानेच आपल्या साथीदारांसह मिळून हा खून केल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. ही खळबळजनक घटना ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजताच्या दरम्यान घडली होती.मृत प्रॉपर्टी डीलर हे कुसुंबी येथे त्यांच्या मामाच्या मयतीला जात असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला