गंगाखेड तालुक्यातील एका तांड्यावर अल्पवयीन मुलीवर चाकुचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, आरोपीच्या नातेवाईकांवर एसआयटी स्थापन करत त्यांची चौकशी करुन हद्दपार करावे यामागणीसाठी गोर सेना व रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी दुपारी 2 30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.